Tuesday, September 10, 2019

निसर्गाची किमया

या निसर्ग सृष्टीचा नियम वेगळा
कधी ऊन तर कधी पाऊस वारा
पावसाळ्यात वर बघतो तर
येताना दिसतात पावसाच्या धारा

आंनदाने मोर फुलवू लागला पिसारा
विजेचा कडकडाट फार झाला
पाऊस धो-धो कोसळू लागला
आनंदाने उड्या मारू लागला कोल्हा

पावसाने सर्व धमाल केली
पक्षी आंनदाने गाणे गाऊ लागली
निसर्गाची ही क्रिया हळूच नयनात स्थिर झाली
मनामध्ये ती एक अविस्मरणीय आठवण राहिली

                     
                              - गणेश शिवाजी जाधव
                                        (जुलै 2009)

दुष्काळ

पाण्यासाठी गाव सारं भणं भणं हींडं
अन् जीवाची भरेना भुकेची ती खिंडं
गुरा ढोरा चारा नायी,पाणी नायी,नायी गार वारा
कडं कडं उन्हामंधी मजूर गाळत असे
घामाच्या त्या धारा

पाण्यासाठी राहावंलागे रात्रभर जागं
अर्ध्या रात्रीपासून लागे नळापुढं बायमाणसांची ती रांगं
खड खड धड धड वाजे भांड्यावर भांडं
ऐन झापटी मंधी वाजे हापशीचरें दांडं

पाणी करता करता दम गेला दाटूनं
हापशी गेली,नळ गेला,विहिरी गेल्या सगळंच गेलं आटूनं
पाणी धुंडत धुंडत जावं लागे कोस कोस लांबं
जिथं तिथं पाणी दिसे तिथं बायमाणसं थांबं

तळकुटात दिसे पाण्यापेक्षा संकटाचा गाळं
अन् पाण्यावाचून खाक झाला गायरानाचा माळं
गावाकडची माणसं आता
घेऊ लागली आता शहराकडं धावं
अन् शहरामंधी माणुसकीला राहिलाच नाही भावं

अन् पाण्यासाठी गावं सारं सुनं सुनं झालं
जस लाल्यारोगाविना आजचा पराटीचा मालं

              
                     - गणेश शिवाजी जाधव (मे 2011)