पाण्यासाठी गाव सारं भणं भणं हींडं
अन् जीवाची भरेना भुकेची ती खिंडं
गुरा ढोरा चारा नायी,पाणी नायी,नायी गार वारा
कडं कडं उन्हामंधी मजूर गाळत असे
घामाच्या त्या धारा
पाण्यासाठी राहावंलागे रात्रभर जागं
अर्ध्या रात्रीपासून लागे नळापुढं बायमाणसांची ती रांगं
खड खड धड धड वाजे भांड्यावर भांडं
ऐन झापटी मंधी वाजे हापशीचरें दांडं
पाणी करता करता दम गेला दाटूनं
हापशी गेली,नळ गेला,विहिरी गेल्या सगळंच गेलं आटूनं
पाणी धुंडत धुंडत जावं लागे कोस कोस लांबं
जिथं तिथं पाणी दिसे तिथं बायमाणसं थांबं
तळकुटात दिसे पाण्यापेक्षा संकटाचा गाळं
अन् पाण्यावाचून खाक झाला गायरानाचा माळं
गावाकडची माणसं आता
घेऊ लागली आता शहराकडं धावं
अन् शहरामंधी माणुसकीला राहिलाच नाही भावं
अन् पाण्यासाठी गावं सारं सुनं सुनं झालं
जस लाल्यारोगाविना आजचा पराटीचा मालं
- गणेश शिवाजी जाधव (मे 2011)
Sunder...
ReplyDeletethanks
ReplyDelete